Marathi birthday, anniversary Wishes to Husband, Best Friend, Boy Friend

Marathi birthday Wishes to husband best Friend Boy Friend


तू सोबत असतांना, आयुष्य किती छान असत  ...

उनाड मोकळ्या आठ्वणींच , एक हिरवगार रान असत  ...

सदैव मनात जपलेल , आठ्वणींच गाव असत  ...

कधी बेधुंद तर कधी बेभान असत ...

खरच तू सोबत असतांना, आयुष्य खूप  छान असत...

तू असतो सावरायला , म्हणून मुद्दाम पडायचं असत...

तू असतो हसवायला, म्हणून मुद्दाम रडायचं असत...

तू असतोस समजवायला, म्हणून मुद्दाम चुकायच असत...

जीवनाच्या सांगिताला , सुरात तुझ्या मिसळायचं असत...

स्वप्नांच्या आयुष्याला, रंगात तुझ्या रंगायच असत...

जीवनाच्या प्रवासाला,सहवासात तुझ्या जगायचं असत...

तू सोबत असतांना, मन पक्षी होऊन उडत असत ..

खरच तू सोबत असतांना, आयुष्य किती सुंदर असत   ...

कितीही संकट आली तरी साथ कधी सोडू नको,

कितीही दूर गेला तरी मला कधी विसरू नको ....

https://lyricsshayri.blogspot.com/

Comments

Post a Comment